Close

बटाट्याची भाजी आणि सुके दम आलू (Potato Bhaji And Dry dum aloo)

बटाट्याची भाजी

साहित्य: 2-3 उकडलेले बटाटे, 8-10 कढीपत्ता, अर्धा टीस्पून जिरे, चवीनुसार सैंधव मीठ, आवश्यकतेनुसार तेल.
कृती : उकडलेल्या बटाट्यांचे लहान तुकडे करून घ्या, कढईत तेल गरम करा. कढीपत्ता आणि जिरे घाला. नंतर बटाटे घाला. सैंधन मीठ घालून मंद आचेवर 3-4 मिनिटे परतून घ्या. गरमागरम राजगिर्‍याच्या पोळीबरोबर सर्व्ह करा.

सुके दम आलू
साहित्य: 250 ग्रॅम लहान बटाटे, 3 चमचे तेल, 2 चिमूट हिंग, 1 तमालपत्र, 2 चमचे जिरे, 2 चमचे लाल तिखट,
1 चमचे धणे-जिरे पावडर, 1 चमचे बेदाणे, 1 टीस्पून बडीशेप, 50 ग्रॅम दही, 1 छोटी दालचिनी, 1/4 टीस्पून काळे मीठ, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : कढईत तेल गरम करून बटाटे धुवून ते स्कूप करून सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. तळलेले बटाटे दह्यात मॅरीनेट करा. त्यात सर्व मसाले आणि मीठ घालून तासभर राहू द्या. कढईत 3 चमचे तेल टाका. हिंग आणि जिर्‍याची फोडणी करा, आता त्यात मॅरीनेट केलेले बटाटे घाला. 2-3 मिनिटे शिजवा आणि आचेवरून उतरवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

Share this article