साहित्य: 250 ग्रॅम उकडलेले बटाटे, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून चाट मसाला, थोडी हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, 1/4 कप चिरलेली कोथिंबीर. सर्व साहित्य मिसळा आणि बाजूला ठेवा.
पीठ तयार करण्यासाठी: 1 कप मैदा, 1 चमचे तेल, चवीनुसार मीठ आणि पाणी. हे सर्व एकत्र करून पीठ मळून घ्या. नंतर मोठ्या आकाराची पोळी लाटा आणि हलकी भाजून घ्या.
कृती: भाजलेल्या पोळीवर बटाट्याचे मिश्रण पसरवून रोल तयार करा. मैद्याच्या पेस्टने त्याच्या कडा बंद करा आणि तळून घ्या. हव्या त्या आकारात कापून सर्व्ह करा.
Link Copied