Close

राजगिरा पनीर पराठा (Rajgira Paneer Paratha)

राजगिरा पनीर पराठा


साहित्य : 1 कप राजगिर्‍याचं पीठ, 2 बटाटे उकडून कुस्करलेले, 1 कप किसलेलं पनीर, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 टीस्पून जिरं, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, स्वादानुसार मीठ, तूप.
कृती : तूप सोडून उर्वरित सर्व साहित्य चांगलं एकजीव करून, मळून घ्या. हे पीठ थोडा वेळ झाकून ठेवा. नंतर त्याचे गोळे तयार करून पराठे लाटून घ्या. पराठे गरम तव्यावर तूप लावून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. गरमागरम राजगिरा पनीर पराठा
हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Share this article