Close

लिंबाचे तिखटगोड लोणचे (Tangy Lemon Pickles)

साहित्यः 1 डझन मोठी लिंबे, अर्धी वाटी लाल तिखट, दीड वाटी मीठ, 1 चमचा मेथी, 1 चमचा हिंगपूड, 
2 चमचे हळद, 1 चमचा तेल.
कृतीः कढईत तेलात हळद, तिखटही परतावे. लिंबे भरल्या वांग्याप्रमाणे कापावीत. त्यात तिखट, हळद, मीठ, हिंग, मेथीपूड भरावी व घट्ट घट्ट असे बरणीत भरावे व वरती थोडे मीठ पसरवावे.
लिंबे चांगली मुरल्यावर खाण्यास घ्यावीत. ह्या अख्ख्या लिंबाच्या लहान लहान फोडी करूनच सटात काढावे. ह्या लोणच्यास जास्त खार हवा असल्यास लिंबाचा रस घालावा.

Share this article