साहित्य: रोटीसाठी 2 कप गव्हाचे पीठ, 1 टीस्पून तूप, चवीनुसार मीठ, पीठ मळण्यासाठी पाणी. सारणासाठी: 2 बटाटे (उकडलेले आणि बारीक चिरलेले), 1 कांदा (बारीक चिरलेला), 1 टोमॅटो (बारीक चिरलेला), 1 सिमला मिरची (बारीक चिरलेली), थोडी हिरवी मिरची, 1/2 टीस्पून आले-लसूण पेस्ट, 1 टीस्पून आमचूर पावडर, 1/2 टीस्पून चाट मसाला, चवीनुसार मीठ, 1/5 टीस्पून शेंगदाणे तेल. कृती : रोटीसाठीचे सर्व साहित्य एकत्र करून मऊ पीठ मळून घ्या. 30 मिनिटे बाजूला ठेवा. पीठ हलक्या हाताने पुन्हा मळून घ्या आणि 8 गोळे करा. त्या लाटून तव्यावर मंद आचेवर भाजा. सारणासाठी: कढईत तेल गरम करा. कांदे गुलाबी होईपर्यंत परतून घ्या, नंतर सिमला मिरची घाला आणि काही मिनिटे शिजवा, टोमॅटो घाला आणि थोडे शिजवा नंतर त्यात बटाटा, हिरवी मिरची आणि आले-लसूण पेस्ट घाला, काही मिनिटे शिजल्यानंतर त्यात आमचूर पावडर घाला, मीठ आणि चाट मसाला घाला. रोटी रॅपसाठी : तयार केलेले सारण रोट्यांमध्ये भरा. ओव्हन 350 अंश सेल्शिअसवर सेट करून 20 मिनिटे रोटी रॅप बेक करा. चटपटीत मँगो डिप बरोबर सर्व्ह करा.
Link Copied