सोशल मीडियावर रुबिना दिलैकच्या चाहत्यांची कमी नाही. जेव्हा ती पोस्ट करते तेव्हा लाखो लोक त्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. काही महिन्यांपूर्वीच तिने आई होणार असल्याचं सांगितलं होतं. आता तिने आणखी एक आनंदाचा धक्का तिच्या चाहत्यांना दिला आहे. एका व्हिडिओमधून रुबीनाने तिला जुळी मुलं होणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच तिने एक भयंकर किस्सा देखील शेअर केला.
रुबिना दिलैकने सांगितले की, जेव्हा त्यांना जुळी मुलं होणार असल्याचे समजलेले त्यानंतर ती चेकअप करुन घरी जात होती तेव्हा तिचा अपघात झालेला. तो काळ तिच्यासाठी सर्वात भयानक स्वप्नासारखा होता. या अपघातानंतर ती इतकी घाबरली की तिने एमरजन्सी सोनोग्राफी करुन घेतली. आपली बाळं ठिक आहेत ना या विचारानेच ती खूप हैराण झालेली.
सोनोग्राफी झाल्यावर तिला दोन्ही बाळं सुखरुप असल्याचे समजताच शांत झाली. त्यानंतर पुढे तीन महिने ही बातमी कोणालाच न सांगण्याचा तिने निर्णय घेतला. तेव्हा केवळ तिला व तिच्या नवऱ्यालाच ठावूक होतं. अभिनव शुक्ला आणि रुबिना दिलैक यांचा विवाह २१ जून २०१८ रोजी झाला होता. लग्नाच्या ५ वर्षानंतर दोघेही आई-वडील होणार आहेत.
रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांच्या लग्नात बरेच चढ-उतार आले आहेत, ज्याचा खुलासा अभिनेत्रीने सलमान खानच्या शो बिग बॉस सीझन १४ मध्ये केला होता. पण आता दोघांमध्ये सारेकाही आलबेल असून दोघेही त्यांच्या आयुष्यातील नव्या पाहुण्यांची वाट पाहत आहेत.