Close

सँडविच उत्तपा (Sandwich Uttapam)

सँडविच उत्तपा


साहित्य : 2 कप सूजी, 1 कप दही, अर्धा कप पाणी, 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 गाजर आणि 1 सिमला मिरची, 2 हिरव्या मिरच्या (सर्व बारीक चिरून घ्या.), मीठ चवीनुसार, पाव कप तूप.

सँडविच बनविण्यासाठी : 1 कांदा आणि 1 टोमॅटो (गोलाकार चिरून घ्या), प्रत्येकी पाव कप शेजवान सॉस, हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस.

कृती : एका बाऊलमध्ये दही, सुजी, मीठ, हिरवी मिरची आणि पाणी एकत्र करून तयार बॅटर 10 मिनिटं बाजूला ठेवा. आता नॉनस्टिक तव्यावर तूप लावून त्यावर
1 टेबलस्पून बॅटर घालून पसरवा. त्यावर चिरलेला कांदा, गाजर, सिमला मिरची आणि टोमॅटो घालून हलकेच दाब द्या. उत्तपा दोन्ही बाजूने खरपूस शेकून घ्या. अजून दोन उत्तपे अशाच पद्धतीने बनवून घ्या.

सँडविच बनविण्यासाठी : एका उत्तप्यावर शेजवान सॉस, दुसर्‍यावर हिरवी चटणी आणि तिसर्‍यावर टोमॅटो सॉस लावा. नंतर पहिल्या आणि दुसर्‍या उत्तप्यांवर गोल कापलेले कांदा आणि टोमॅटो ठेवा शेवटी तिसरा उत्तपा ठेवून तयार सँडविच सर्व्ह करा.

Share this article