ससुराल सिमर का फेम अभिनेता शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर यांच्याकडून नुकतीच आनंदाची बातमी समोर आली आहे. दोघेही आई-बाबा झाले आहेत. खुद्द अभिनेत्रीने एका अधिकृत पोस्टद्वारे ही गोड बातमी सांगितली आहे.
शोएब आणि दीपिकाच्या घरी एका छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. अभिनेत्री दीपिका कक्करने मुलाला जन्म दिला आहे. यासोबतच अभिनेत्रीने डिलिव्हरीचे अपडेटही दिले आहे. मुलाची प्रसूती आणि जन्मानंतर दीपिका कक्करने काय पोस्ट शेअर केली आहे ते पाहूया.
बाळाच्या येेण्याने दोघेही आईबाबा खूप खुश आहेत. काही महिन्यांपूर्वीच दीपिकाने तिच्या गरोदरपणाची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
Link Copied