Close

सुरण लाजवाब (Suran Lajawab)

सुरण लाजवाब


साहित्य : अर्धा किलो उकडून कुस्करलेले सुरण, पाव किलो उकडून कुस्करलेले रताळे, 4 टेबलस्पून वरीचे तांदूळ, 2-3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून बडीशेप, स्वादानुसार सैंधव, आवश्यकतेनुसार तेल.

कृती : एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून त्यात मिरचीची फोडणी करा. त्यात बडीशेप आणि कुस्करलेली रताळी व सुरण घालून मिश्रण नरम होईपर्यंत शिजवा. त्यात वरीचे तांदूळ आणि मीठ एकत्र करून पाच ते सात मिनिटं शिजवा. मिश्रण थंड झाल्यावर आपल्या आवडीनुसार आकाराची टिक्की तयार करा.
एका नॉनस्टिक तव्यावर थोडं तेल पसरवून त्यावर या टिक्क्या दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करा. गरमागरम सुरण लाजवाब हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Share this article