Close

तिरंगा खिचडी (Tiranga Khichadi)

तिरंगा खिचडी


साहित्य : 300 ग्रॅम वरीचे तांदूळ, 3 टेबलस्पून तूप, काही कडिपत्ते, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 कोथिंबिरीची जुडी (स्वच्छ केलेली), 1 पुदिन्याची जुडी (स्वच्छ केलेली पानं), 2-3 हिरव्या मिरच्या, काही केशराच्या काड्या (अर्धा कप दुधामध्ये एकत्र करून), स्वादानुसार सैंधव, गार्निशिंगसाठी थोडे भाजलेले काजू.

कृती : हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना एकत्र बारीक वाटून घ्या. एका पॅनमध्ये तूप गरम करून जिरं आणि कडिपत्त्याची फोडणी करा. नंतर त्यात धुऊन निथळलेले वरीचे तांदूळ, मीठ, लाल मिरची पूड आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण लावून शिजत ठेवा. तांदूळ शिजल्यावर आचेवरून खाली उतरवून तीन समान भागात विभागा आणि थाळीमध्ये सुटा होण्यासाठी ठेवून द्या. तांदळाच्या एका भागामध्ये केशराचं मिश्रण आणि दुसर्‍यामध्ये हिरवी वाटण घालून एकजीव करा. तिसरा भाग तसाच राहू द्या. सर्व्हिंग डिशमध्ये या तीनही रंगाची खिचडी ठेवून, ती काजूने सजवा आणि सर्व्ह करा. गरमागरम तिरंगा खिचडी ड्रायफ्रूट कढीसोबत सर्व्ह करा.

Share this article