Close

व्हेज सोया बिर्याणी (Veg Soya Biryani)

साहित्य:

२ कप तांदूळ (मीठ घालून शिजवलेले)

१/४ कप मिश्र भाज्या (चिरलेल्या)

सोयाचे तुकडे २ कप कोमट पाण्यात भिजवलेले

१/४ टीस्पून हळद पावडर

१ टीस्पून लाल मिरची पावडर

लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ

थोडी कोथिंबीर, हलके तळलेले काजू

पेस्टसाठी :

२ कांदे,  लसूण ५ पाकळ्या

५ हिरव्या मिरच्या , १ तुकडा आले

१ टोमॅटो, थोडी चिरलेली कोथिंबीर

१ टीस्पून किसलेले खोबरे- सर्व साहित्य एकत्र करून बारीक करा.

पावडर मसाल्यासाठी :

३-४ लवंगा , १ तुकडा दालचिनी

२-३ मोठ्या वेलची, १ जावित्री

2 टीस्पून खसखस, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर

चवीनुसार मीठ , ४ चमचे तूप

सर्व साहित्य गरम करून बारीक पावडर करून घ्या.

कृती :

कढईत तूप गरम करून त्यात कांदा-खोबऱ्याची पेस्ट घालून परतून घ्या.

सोयाचे तुकडे, मिश्र भाज्या, मसाला पावडर, तांदूळ, तिखट, हळद आणि मीठ एकत्र करून झाकण ठेवून मंद आचेवर १५-२० मिनिटे शिजवा.

तयार सोया बिर्याणी कोथिंबीर, लिंबाचा रस आणि तळलेले काजू यांनी सजवा.

Share this article