Close

देबिनाने पुन्हा एकदा केले आपल्या दोन्ही लेकींसोबत फोटोशूट, पाहा नजर न हटवणारे फोटो….. (Debina Bannerjee shares adorable pics with Liana and Divisha, see photos)

देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी, टीव्हीवरील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक, सर्वांचे आवडते आहेत. देबिना सध्या तिच्या दोन मुली लियाना चौधरी आणि दिविशा चौधरी यांच्यासोबत शोबिझच्या जगापासून दूर राहून पालकत्वाच्या प्रवासाचा आनंद घेत आहे आणि दोन्ही मुलींसोबत खास वेळ घालवत आहे. देबिना तिच्या राजकुमारींसोबत घालवलेले प्रत्येक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करते. त्यामुळेच देबिनाचे इंस्टाग्राम लियाना आणि दिविशाच्या क्यूट फोटोंनी भरलेले आहे.

पुन्हा एकदा देबिनाने तिच्या दोन मुलींसोबत एक सुंदर फोटोशूट केले आहे. जे तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोशूटमध्ये लियाना आणि दिविशा एवढ्या क्यूट दिसत आहेत की त्या दोघांच्या क्यूटनेसवर चाहत्यांची नजर हटत नाहीय.

या फोटोशूटमध्ये देबिना आणि तिच्या दोन मुली पांढऱ्या रंगात मॅचिंग कपड्यांमध्ये दिसत आहेत. लियाना आणि दिविशा राजकुमारी किंवा बाहुलीसारख्याच दिसत आहेत.

हे फोटो शेअर करताना देबिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "काही दिवसांपूर्वी आम्ही आमच्या बाळांसोबत काही फोटो क्लिक केले. पण हे फोटोशूट जितके परफेक्ट दिसत आहेत. तितकेच ते करणे सोपे नव्हते.  माझे विस्कटलेले केस पाहून तुम्ही हे समजू शकता." अंदाज लावा." यासोबतच देबिनाने फोटोग्राफरला थँक यूही म्हटले आहे.

देबिनाने एकूण चार फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत तुम्ही पाहू शकता की देबिना तिची लहान मुलगी दिविशा आणि पाळीव कुत्रा पाब्लोसोबत पोज देत आहे. दुसऱ्या फोटोत दिविशा पाब्लोसोबत खेळत आहे, तर इतर दोन फोटोंमध्ये लियाना हसत हसत कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहे.

आई आणि मुलींची ही छायाचित्रे खूप गोंडस असल्यामुळे चाहतेही त्यावर जीव ओवाळून टाकत आहेत.  विशेषत: लियाना आणि दिविशा यांच्यासाठी कमेंट करत आहेत आणि त्यांच्या क्यूटनेसचे खूप कौतुक करत आहेत.

यापूर्वी देबिनाने बनारसला जाऊन काशीमध्ये दोन्ही मुलींचे मुंडण करून घेतले, ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ तिने शेअर केले होते. याशिवाय, 11 मे 2023 रोजी, देबिनाने तिची धाकटी मुलगी दिविशा 6 महिन्यांची झाल्यावर तिच्यासाठी वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती, ज्याच्या काही झलक देबिनाने तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केल्या होत्या.

Share this article