Close

उपवासाचा बदामी खाजा (Almond Khaja)

उपवासाचा बदामी खाजा

साहित्य : 1 वाटी शिंगाडा पीठ, 1 वाटी राजगीरा पीठ, सांदणासाठी तूप व राजगीरा पीठ, 1 वाटी साखर (पाकासाठी), 4-5 टीस्पून बदामाची पूड, 3-4 चमचे पिठी साखर, 3-4 टीस्पून लिंबाचा रस, वेलची पूड, चवीनुसार मीठ.

कृती : शिंगाडा व राजगीरा पीठ एकत्र करा. मीठ व पाणी टाकून घट्ट कणीक मळून घ्या. 5-6 टीस्पून तूप, बदामाची पूड, वेलची पूड व थोडे राजगीरा पीठ एकत्र करून त्याचे सांदण तयार करुन घ्या. 2 वाटी साखरेत 1 वाटी पाणी टाकून पाक तयार करून घ्या. शेवटी त्यात लिंबाचा रस टाका. शिंगाडा, राजगीरा पीठाच्या पोळ्या लाटा, पोळीवर सांदण लावा. परत वर पोळी ठेवा त्यावर सांदण लावा व परत वर लाटलेली पोळी ठेवा. याचा घट्ट रोल वळून घ्या. एक सेंटीमीटर अंतरावर रोल कापून जरा हाताने दाबून घ्या. मध्यम आचेवर तुपात तळा. मग गरम पाकात टाका. पाकात मुरल्यावर दोन मिनिटांनी खाजा काढून त्यावर पिठीसाखर भुरभुरा. सजावट करून सर्व्ह करा.
टिप : राजगीरा व शिंगाडाच्या पिठाला जास्त चिकटपणा नसल्याने जेव्हा रोल कापाल तेव्हा सावकाश हलक्या हाताने दाबून, लगेच कढईत तळायला टाका. नाहीतर खाजा तुटू शकतो.

Share this article