Close

ब्लॅक करंट डिलाइट आणि डान्सिन्ग डेजी (Black Currant Delight And Dancing Daisy)

ब्लॅक करंट डिलाइट


साहित्य : 2 कप काळ्या द्राक्षांचा रस,1 कप व्हॅनिला आइस्क्रीम, अर्धा टीस्पून काळं मीठ, आवश्यकतेनुसार शुगर सिरप, बर्फाचे तुकडे.
कृती : काळ्या द्राक्षांचा रस, व्हॅनिला आइस्क्रिम, काळं मीठ आणि शुगर सिरप एकत्र करून ब्लेण्ड करा. यात बर्फाचे तुकडे टाकून पुन्हा ब्लेण्ड करा. ब्लॅक करंट डिलाइट सर्व्ह करा.

डान्सिन्ग डेजी


साहित्य : गुलाब आइस क्यूब बनविण्यासाठी ः एक कप पाणी, 3 टेबलस्पून रोज सिरप. दोन्ही एकत्र करून आइस ट्रेमध्ये बर्फ जमविण्यासाठी ठेवा.
ज्यूस बनविण्यासाठी : 200 मि.ली. आंब्याचा रस, 1 कप संत्र्याचा रस, लिंबाचा रस, 1 कप लेमन फ्लेवर सोडा.
कृती : आंब्याचा रस, संत्र्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र मिसळा. यात लेमन फ्लेवर सोडा मिसळून एकत्र ब्लेण्ड करा. आता ग्लासमध्ये चार-पाच गुलाब आइस क्यूब टाका. यावर तयार केलेला ज्यूस टाका आणि थंडगार ज्यूस सर्व्ह करा.

Share this article