Close

केकू आणि बटाटा – पोहे पॅटीस (Caku And Potato – Pohe Patties)

केकू
साहित्य : अर्धा जुडी पालक आणि 2-3 बारीक चिरलेले बटाटे, पांढरी मिरी पावडर, चवीनुसार मीठ , कॉर्नफ्लोअर आणि तेल आवश्यकतेनुसार.
कृती : कॉर्नफ्लोअर पाण्यात विरघळवून डोशांप्रमाणे गोलाकार भाजून घ्या. बटाटे आणि पालक एका फ्राईंग पॅनमध्ये तेलात परतून घ्या. त्यात मीठ आणि पांढरी मिरी पावडर टाकून पुन्हा परतवा. आता हे मिश्रण कॉर्नफ्लोअर पोळीमध्ये भरून घ्या. चौकोनी आकारात कापून गरम तेलात तळून घ्या.

बटाटा - पोहे पॅटीस
साहित्य: 2 वाट्या भिजवलेले पोहे, 3 उकडलेले बटाटे, आवश्यकतेनुसार तेल, 4 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे बेसन, 1 टीस्पून आले पेस्ट, 1 टीस्पून लसूण पेस्ट,अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ.
कृती : भिजवलेले पोहे घ्या. बटाटे सोलून मॅश करा. आता तेल सोडून वरील सर्व साहित्य मिक्स करा. नीट मळून घ्या. नंतर त्याचे छोटे गोळे बनवा. कढईत तेल गरम करून तळून घ्या, हवे असल्यास शॅलो फ्रायही करू शकता. टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.

Share this article