Close

चिकन मीट बॉल सूप (Chicken Meatball Soup)


साहित्य : 200 ग्रॅम बारीक चिरलेले चिकन, प्रत्येकी 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर व लसूण, 1 बारीक चिरलेला कांदा,
1 टीस्पून काळी मिरी पूड, 1 टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 क्यूब चिकन स्टॉक, 1 फेटलेले अंडे, 1 टीस्पून चिली व्हिनेगर, 1 कप पाणी, 3 टीस्पून मैदा, 2 चिमूट अजिनोमोटो, आवश्यकतेनुसार तेल, स्वादानुसार मीठ व सजावटीसाठी बारीक चिरलेली कांद्याची पात.
कृती : चिकन मीट बॉल्ससाठी : फूड प्रोसेसरमध्ये चिकन, हिरवी मिरची, प्रत्येकी 1 टीस्पून लसूण व कांदा आणि स्वादानुसार मीठ घालून बारीक करून घ्या. एका भांड्यात हे वाटण काढून त्यात फेटलेले अंडे व मैदा घालून मळून घ्या.
या मिश्रणाचे लहान-लहान गोळे तयार करा. एका भांड्यांत पाणी गरम करून त्यात हे गोळे शिजत ठेवा. बॉल्स पाण्यावर
तरंगू लागले की आच बंद करून पाणी गाळून घ्या. चिकन मीट बॉल्स व पाणी वेगवेगळे ठेवून द्या.
सूप तयार करण्यासाठी : एका भांड्यात तेल गरम करून त्यात लसूण घालून परतवा. त्यात चिकन बॉल्स शिजवलेले
पाणी व चिकन स्टॉक क्यूब्ज घालून शिजवा. त्यात स्वादानुसार मीठ, अजिनोमोटो, चिली व्हिनेगर आणि काळी मिरी पूड एकत्र करा. नंतर त्या चिकन बॉल्स, कोथिंबीर व कांद्याची पात घालून सर्व्ह करा.

Share this article