चिली गार्लिक बटाटे
साहित्य : 4-5 लांब कापलेले बटाटे, बारीक चिरलेला पातीचा कांदा, 1-1 टीस्पून चिरलेला लसूण, आले, लाल मिरची पावडर, अर्धा कप टोमॅटो सॉस. 1 चमचा तेल, 1 कप व्हेजिटेबल स्टॉक, 1 चमचा पाण्यात विरघळवलेले कॉर्नफ्लोवर
कृती: बटाट्याचे काप गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. कढईत तेल गरम करून त्यात आले व लसूण घालून परतून घ्या. लाल मिरचीची पेस्ट घालून टोमॅटो सॉस आणि व्हेजिटेबल स्टॉक घालून उकळवा. कॉर्नफ्लोअर घालून ग्रेव्ही घट्ट करा. ग्रेव्हीत बटाटे आणि कांद्याची पात घाला. चांगले मिसळा आणि गरम सर्व्ह करा.
उपवासाचा बटाटा वडा
साहित्य: 4 उकडलेले बटाटे, 1 वाटी नायलॉन साबुदाणा, चिरलेली हिरवी मिरची, अर्धा टीस्पून जिरे, चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि साखर, तळण्यासाठी तूप किंवा शुद्ध तेल.
कृती : बटाटे उकडून सोलून किसून घ्या. त्यात मीठ आणि साखर, चिरलेली हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर घालून मिक्स करा. आता त्याचे गोळे बनवा आणि नायलॉन साबुदाण्यामध्ये गुंडाळून तळून घ्या. (हा नायलॉन साबुदाणा तळल्यावर फुगतो.)