कव्हरसाठी साहित्य: 2 कप उकडलेले व मॅश केलेले बटाटे आणि 3 चमचे कॉर्नफ्लोअर.
सारणासाठी: 1 कप किसलेले खोबरे, 2-2 चमचे काजूचे तुकडे, मनुके, खसखस, 2 चमचे तीळ, 5 टेबलस्पून साखर, तळण्यासाठी तेल, सर्व्ह करण्यासाठीहिरवी चटणी आणि गोड दही.
कृती: कव्हर तयार करण्याचे साहित्य चांगले मिक्स करावे आणि सारणाचे सर्व साहित्य मिक्स करावे. कव्हरच्या पिठाचे छोटे गोळे बनवा. त्यात सारणाचे साहित्य भरून नीट कव्हर करा. गरम तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. हिरवी चटणी आणि गोड दह्यासोबत सर्व्ह करा.
Link Copied