दही -बटाट्याची भाजी
साहित्य : 12 नवीन बटाटे (मध्यम आकाराचे), 275 ग्रॅम दही, सव्वा कप पाणी, 1/4 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धणेपूड, अर्धा टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून साखर, 1 टीस्पून कोथिंबीर,
2 हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार.
कृती : बटाट्याचे तुकडे मिठाच्या पाण्यात उकडा. एका भांड्यात दही, पाणी, हळद, लाल तिखट, धणे-जिरे पावडर, साखर आणि थोडे मीठ मिक्स करा. आता हे मिश्रण मंद आचेवर 3 मिनिटे परतून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची आणि बटाट्याचे तुकडे घालून चांगले मिसळा आणि 6-7 मिनिटे शिजू द्या. गरमागरम सर्व्ह करा.
Link Copied