साहित्य: 500 ग्रॅम उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे, 1 कप बारीक वाटलेले हिरवे वाटाणे, 2 टीस्पून आले-हिरवी मिरची पेस्ट, 1-1 टीस्पून गरम मसाला आणि आमचूर पावडर, 2 टीस्पून चाट मसाला, अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धा कप तेल, चवीनुसार मीठ, हिरवी चटणी आणि गोड चटणी.
कृती : उकडलेल्या बटाट्यात चाट मसाला, गरम मसाला, आमचूर पावडर, कोथिंबीर आणि मीठ एकत्र करून घ्या. कढईत तेल गरम करून मटार परतून घ्या. त्यात गरम मसाला, आमचूर पावडर, आले-हिरवी मिरची पेस्ट, हिरवी कोथिंबीर घालून परतवा.
एका भांड्याला तेल लावून बटाट्याच्या मिश्रणाचा थर तयार करा त्यावर गोड चटणी घाला. त्यानंतर त्यावर वाटाण्याच्या मिश्रणाचा थर लावा. नंतर हिरवी चटणी आणि बटाट्याच्या मिश्रणाचा थर तयार करा. वरून 2-3 चमचे तेल लावून ओव्हनमध्ये 200 डिग्री सेल्शिअसवर 10 मिनिटे बेक करावे. गरमागरम सर्व्ह करा.
हराभरा चाट (Harbhara Chat)
Link Copied