साहित्य : 100 ग्रॅम उकडलेले लहान बटाटे (बेबी पोटॅटो), अर्धा कप बारीक चिरलेली लाल व हिरवी सिमला मिरची,
अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट, प्रत्येकी 1 टेबलस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची, सोया सॉस व कॉर्नफ्लोअरचे (पाण्यात घोळून) मिश्रण, 1 टीस्पून ब्राउन शुगर, स्वादानुसार मीठ व काळी मिरी पूड, आवश्यकतेनुसार तेल, सजावटीसाठी बारीक चिरलेली कांद्याची पात.
कृती : कढईमध्ये तेल गरम करून त्यात आले-लसणाची पेस्ट व हिरवी मिरची परतवून घ्या. त्यात कांदा व सिमला मिरची घालून 1-2 मिनिटे मध्यम आचेवर परतवा. त्यात उकडलेले बटाटे, सोया सॉस, ब्राउन शुगर, मीठ व काळी मिरी पूड घालून परतवा. आवश्यकतेनुसार पाणी व कॉर्नफ्लोअरचे मिश्रण घालून ग्रेव्ही दाट होईपर्यंत शिजवा. नंतर आच बंद करून बारीक चिरलेल्या कांद्याच्या पातीने सजवा.
हुनान स्टाइल व्हेजिटेबल्स (Hunan Style Vegetables)
Link Copied