कैरीचे लोणचे
साहित्यः 2 कप कैरीच्या लहान फोडी (3 लहान कैर्या), दिड टिस्पून मीठ, अर्धा टिस्पून हिंग, अर्धा टिस्पून तळलेल्या मेथी दाण्याची पावडर, 1 टेबलस्पून मोहरी पावडर, 2 टेबलस्पून लाल तिखट.
फोडणीसाठी: 4 टेबलस्पून तेल, अर्धा टिस्पून मोहरी, अर्धा टिस्पून हळद, पाव टिस्पून हिंग
कृती: कैर्या धुवून नीट कोरड्या करून मगच त्याच्या फोडी कराव्यात. कैरीच्या फोडींना तासभर मीठ, लाल तिखट आणि हिंग लावून ठेवावे. 12-15 मेथी दाणे तेलात तळून घ्यावे. खलबत्त्यात कुटून बारीक पूड करावी. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, आणि हळद घालून फोडणी करावी. ही फोडणी एखाद्या काचेच्या किंवा स्टीलच्या वाटीत काढून गार होऊ द्यावी. कैरीच्या फोडींमध्ये मेथी पूड, मोहरी पूड आणि गार झालेली फोडणी घालून मिक्स करावे. हे लोणचे लहान काचेच्या बरणीत भरून ठेवावे.
लोणच्याचा तयार मसाला
साहित्यः 1 वाटी मोहरीची डाळ (त्यातील अर्ध्या डाळीची पूड करावी.) अर्धी वाटी लाल तिखट, 2 चमचे मेथी, 4 चमचे हळद,
2 चमचे हिंग (त्यातील एक खडा असावा.) 1 वाटी मीठ, अर्धी वाटी तेल.
कृतीः 2 चमचे तेलात मेथी लालसर तळून घ्यावी. त्याच तेलात हिंगाचा खडा फुलवावा. उरलेले तेल घालून त्यात मोहरी, हळद हिंग ह्यांची पूड करून घालावी. मीठ घालून एकत्र करावे. (लोणच्याचा तयार मसाला पदार्थात वापरताना त्यात मीठ घालावयासच हवे कारण ते त्या पदार्थाच्या चवीसाठी असते.)