काजू करी
साहित्य : अर्धा वाटी वरीचं पीठ, अर्धा वाटी साबुदाण्याचं पीठ, अर्धा वाटी शिंगाड्याचं पीठ, 2 डाव साजूक तूप, अर्धा चमचा जिरेपूड, स्वादानुसार सैंधव.
कृती : साधारण 1 वाटी पाणी उकळवत ठेवा. त्यात मीठ व तूप घालून आच बंद करा. वरीचं, साबुदाण्याचं आणि शिंगाड्याचं पीठ एकत्र चाळून घ्या. त्यात जिरेपूड आणि गरम पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. हे पीठ तासाभरासाठी ओल्या रुमालात झाकून ठेवा. नंतर या पिठाचे त्रिकोणी नान लाटून, गरम तव्यावर थोडं तूप घालून भाजून घ्या.
साहित्य : 2 वाटी ओले काजूगर, दीड वाटी खवलेला ओला नारळ, 8-10 संकेश्वरी मिरच्या, 8-10 काश्मिरी लाल मिरच्या, लहान आल्याचा तुकडा, 2 चमचे मलई, 1 चमचा जिरं, थोडे कोकम, स्वादानुसार सैंधव.
कृती : नारळाचा चव मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. याचं साधारण 3 वाटी दूध तयार करा. एक पॅनमध्ये तेल गरम करून त्यावर बारीक चिरलेलं आलं आणि मिरच्या परतवून घ्या. आच बंद करून ते थंड होऊ द्या. थंड झालेलं आलं आणि मिरची मिक्सरमधून बारीक करून घ्या.
त्याच पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरं घाला. जिरं तडतडलं की, त्यात आलं-मिरचीचं वाटण घालून परतवा. नंतर त्यात कोकम घालून व्यवस्थित परतवून घ्या. त्यात काजूगर घालून मिश्रण तेल सुटेपर्यंत चांगलं परतवा. नंतर त्यात नारळाचं दूध घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या. मिश्रणाला एक उकळी आली की,
आच बंद करा. त्यात मीठ आणि मलई घालून मिश्रण एकजीव करा आणि गरमागरम सर्व्ह करा.