ओल्या हळदीचे लोणचे
साहित्यः 50 ग्रॅम ओली हळद, 25 ग्रॅम आंबेहळद, 25 ग्रॅम आले, 1 लिंबू, 1 चमचा मीठ.
कृतीः दोन्ही हळदी व आले बारीक किसावे. त्यावर लिंबू पिळावे. मीठ घालावे. आजारी, अशक्त व्यक्तींना तोंडाला चव नसेल तेव्हा हे पथ्यकर लोणचे जरूर द्यावे.
बोराचे लोणचे
साहित्यः अर्धा किलो पिकलेली आंबट गोड बोरे, 50 ग्रॅम गूळ, 1 चमचा तिखट, 1 चमचा हळद, फोडणीसाठी अर्धी वाटी तेल, हिंग, मोहरी, चवीनुसार मीठ.
कृतीः बोरे धुऊन, पुसून बिया व डेख काढून स्वच्छ करावीत आणि मीठ लावून उन्हात वाळवावीत. गुळाचा जरा जाडसरच पाक करून त्यात बोरांचा गर, तिखट, मीठ, हळद घालावी व जरा शिजू द्यावे. तेल तापवून हिंग, मोहरीची फोडणी करावी व गार झाल्यावर वरील मिश्रणावर घालावी व मिश्रण चांगले कालवावे. लोणचे बरणीत भरून ठेवावे.