ऑनियन पेसारट्टू डोसा
साहित्य : पेसारट्टू डोशाचे पीठ, कांद्याची चटणी (कृतीसाठी ऑनियन उत्तपाची पाककृती पाहा), 1 बारीक चिरलेला कांदा.
कृती : नॉनस्टिक तवा गरम करून त्यास तेल लावून त्यावर 1 टेबलस्पून डोशाचे पीठ पसरवा. त्यावर आवडीनुसार कांद्याची चटणी पसरवा. नंतर बारीक चिरलेला कांदा भुरभुरून झाकण लावून शिजू द्या. शिजल्यानंतर आचेवरून उतरवून टोमॅटो चटणी व सांबारासोबत सर्व्ह करा.
टोमॅटोची चटणी
साहित्य : 1 कप हिरवा टोमॅटो (चिरलेला), 5 हिरव्या मिरच्या (चिरलेला), 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट, थोडी पुदिन्याची पाने, थोडी कोथिंबीर, 1 टीस्पून भाजलेल्या तिळाची पूड, आवश्यकतेनुसार तेल, स्वादानुसार मीठ.
फोडणीसाठी : प्रत्येकी अर्धा टीस्पून मोहरी, जिरे, हळद व उडीद डाळ, 2 अख्ख्या लाल मिरच्या.
कृती : एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कोथिंबीर व पुदिन्याची पाने थोडी परतवून बाजूला काढून ठेवा. त्याच तेलामध्ये टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवा. नंतर आच बंद करून थंड होऊ द्या. कोथिंबीर, पुदिना, टोमॅटो आणि उर्वरित सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. एका भांड्यात तेल गरम करून त्यात फोडणीचे सर्व साहित्य घालून फोडणी करून घ्या. टोमॅटोच्या वाटणामध्ये ही फोडणी घालून एकत्र करा आणि सर्व्ह करा.