बटाटा सेलेरी सूप
साहित्य : 3 उकडलेले बटाटे, 1 सेलेरी स्टिक बारीक चिरून घ्या, 1 टीस्पून बटर, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर, अर्धा चमचा लिंबाचा रस, 250 मि.ली. गरम पाणी, गार्निशिंगसाठी चीज.
कृती : सेलेरी बटरमध्ये तळून घ्या आणि उकडलेले बटाटे पाण्यात मॅश करा. त्यात मीठ, काळीमिरी पावडर टाकून गरम पाण्यात मिसळून उकळून घ्या, गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. 10 मिनिटे उकळा, त्यात लिंबाचा रस घाला आणि चीजने सजवा आणि गरम सर्व्ह करा.
Link Copied