Close

सँडविच आणि बटाटा – काजू रोल्स (Sandwich And Potato Cashew Role)

सँडविच
साहित्य: 4 पांढर्‍या ब्रेडचे तुकडे, 4 ब्राऊन ब्रेडचे तुकडे, 3 उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे, 1 कांदा बारीक चिरलेला,1 टेबलस्पून पावभाजी मसाला,2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून तिखट, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल, सजवण्यासाठी लेट्युसची पाने.
कृती : ब्रेडच्या कडा कापून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात कांदा घालून परता. उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे आणि उर्वरित साहित्य घाला आणि चांगले मिसळा. हे मिश्रण ब्रेडच्या स्लाइसवर लावा. लेट्यूसच्या पानांनी सजवा आणि टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा.

बटाटा - काजू रोल्स
साहित्य: 1 वाटी उकडून मॅश केलेले बटाटे, पाव वाटी किसलेले खोबरे,1वाटी साखर, पाव वाटी काजू, अर्धा टीस्पून वेलची पावडर, चिमूटभर केशर.
कृती : एका कढईत बटाटे आणि किसलेले खोबरे एकत्र करा. मंद आचेवर सतत ढवळत राहा. मिश्रण सुकल्यावर आचेवरून काढून बाजूला ठेवा. काजू बारीक वाटून त्यात वेलची पावडर, साखर आणि केशर घाला. बटाट्याच्या मिश्रणात काजूचे मिश्रण भरून रोल तयार करा. बटाट्याच्या मिश्रणात रंग टाकूनही तुम्ही त्यांना रंगीबेरंगी बनवू शकता.

Share this article