साहित्य : 300 ग्रॅम लांबट तुकड्यांमध्ये कापलेले बोनलेस चिकन, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 2 टीस्पून तिळाचे तेल, 2 टेबलस्पून तेल, प्रत्येकी
1 टीस्पून बारीक चिरलेले आले व लसूण,
2 टीस्पून बारीक चिरलेली सुकी लाल मिरची,
2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेली सिमला मिरची, 2 टेबलस्पून सोया सॉस, 2 टीस्पून राइस वाइन, 1 टीस्पून मीठ.
कृती : एका भांड्यात मीठ, कॉर्नफ्लोअर व तिळाचे तेल एकजीव करा. या मिश्रणात चिकनचे तुकडे एका तासाकरिता मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्या. नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आले, लसूण, सुकी लाल मिरची व हिरवी मिरची घालून 1 मिनिट परतवा. त्यात मॅरिनेट केलेले चिकन व कांदा घालून परतवा. चिकन हलके तपकिरी रंगाचे झाले की त्यात सिमला मिरची, सोया सॉस व राइस वाइन घालून चिकन शिजेपर्यंत परतवा.
शेजवान चिली चिकन (Schezwan Chilli Chicken)
Link Copied