Close

शेझवान दही पुरी (Schezwan Dahi Puri)

शेझवान दही पुरी


साहित्य: 6 पाणीपुरीच्या पुर्‍या, 1 बटाटा, 1-1 टीस्पून शेझवान सॉस, चिली सॉस, चाट मसाला, लाल तिखट, बारीक शेव, चिरलेली लसूण, 1-1 चमचा तेल आणि टोमॅटो सॉस, अर्धा टीस्पून आले, 30 ग्रॅम बुंदी, चवीनुसार मीठ.

कृती: कढईत तेल गरम करून त्यात लसूण व आले परतून घ्या. लसूण सोनेरी झाल्यावर त्यात चिली सॉस, टोमॅटो सॉस, मीठ आणि लाल तिखट घालून 5 मिनिटे परतून घ्या. बटाटे उकडून त्याचे काप करा. लाल तिखट आणि मीठाच्या मिश्रणात मॅरीनेट करा. बुंदी भिजवून पाणी पिळून घ्या, पुरी फोडून त्यात बटाटा-बुंदी घाला, नंतर वरील मिश्रण आणि शेझवान सॉस घाला. वरुन दही, चाट मसाला, शेव आणि हिरवी कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

Share this article