Close

तीळ आलू बीन्स (Sesame Aloo Beans)

साहित्य : 200 ग्रॅम फरसबीचे उकडलेले लहान तुकडे, 4 उकडलेले बटाटे, 2 कप चिरलेल्या कांद्याची पात,
1 टीस्पून पांढरे तीळ, 1 टीस्पून जिरे, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद,1 टीस्पून तेल, चवीनुसार मीठ

कृती: उकडलेले बटाट्याचे लहान तुकडे करा. कढईत तेल गरम करून त्यात पांढरे तीळ आणि जिरे टाका. नंतर कांद्याची पात आणि फरसबी घाला. मीठ घालून थोडा वेळ शिजवून घ्या, नंतर बटाटे, टोमॅटो आणि मीठ घालून मिश्रण मंद आचेवर शिजवा. 2 मिनिटे सर्व मसाले शिजल्यानंतर गॅसवरून काढून गरमागरम पोळीबरोबर सर्व्ह करा.

Share this article