सोया बटाटा टिक्का
साहित्य: 3 उकडलेले व मॅश केलेले बटाटे, अर्धी वाटी उकडलेले सोयाबीन,अर्धा टीस्पून आले-मिरची पेस्ट, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, चवीनुसार मीठ.
कृती : सर्व साहित्य एकत्र करून छोटे गोळे बनवा. भरण्यासाठी: 2 चमचे किसलेले खोबरे, अर्धी वाटी मक्याचे दाणे, 1 टीस्पून साखर, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, 1/4 टीस्पून गरम मसाला पावडर, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ.
कृती : सर्व साहित्य मिक्स करावे. सोया-बटाट्याच्या गोळ्यांमध्ये भरून तळून घ्या. पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
वाल आणि बटाट्याचे भरीत
साहित्य : 3 मध्यम आकाराचे बटाटे, 250 ग्रॅम वाल, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 मोठा कांदा बारीक चिरलेला, 1 चमचा कोथिंबीर बारीक चिरलेली, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा मोहरीचे तेल.
कृती : वाल आणि बटाटे उकडून घ्या. वालाच्या बाजूची साल काढा. हलके दाबून पाणी पिळून घ्या. बटाटे आणि वाल मॅश करा. त्यात हिरवी धणे, मोहरीचे तेल, हिरवी मिरची, कांदा आणि मीठ घाला. हवं असल्यास लिंबाचा रसही घालू शकता. पोळी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.