साहित्य: 100 ग्रॅम उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे, 1-1 पिवळी आणि लाल सिमला मिरची, 1 ग्रॅम केशर, 15 ग्रॅम गरम मसाला, 100 ग्रॅम मॅश केलेले पनीर, 20 ग्रॅम मिरची, 15 ग्रॅम जिरे, 150 ग्रॅम कापलेला कांदा, 200 मि.ली फ्रेश क्रीम, 100 ग्रॅम चिरलेला लसूण, 10 ग्रॅम साखर, 250 ग्रॅम चिरलेला टोमॅटो, 150 मि.ली. तेल, 150 ग्रॅम काजू पेस्ट, 50 ग्रॅम बटर, 10-10 ग्रॅम लाल आणि पिवळी शिमला मिरची चिरलेली, 50 ग्रॅम मावा, चवीनुसार मीठ कृती: लाल आणि पिवळी सिमला मिरची वरून कापून आतल्या बिया काढा. फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करा. चिरलेला लसूण आणि कांदा दोन भागांमध्ये विभागून घ्या. एक भाग तेलात टाका आणि गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात चिरलेला टोमॅटो घाला आणि 15 मिनिटे शिजवा. नंतर उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे आणि पनीर घालून 10 मिनिटे शिजवा. मावा, गरम मसाला आणि मीठ मिक्स करून 5 मिनिटे शिजवा आणि गॅसवरून काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. हे मिश्रण लाल आणि पिवळ्या सिमला मिरचीमध्ये भरून त्याचे चार तुकडे करा. कढईत 2 चमचे तेल गरम करून त्यात जिरे, उरलेला कांदा, लसूण आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या. आता गरम मसाला, काजू पेस्ट, क्रीम आणि केशर घालून झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवा. आता या ग्रेव्हीच्या वर भरलेले सिमला मिरची ठेवून पोळी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.
Link Copied