साहित्य: 200 ग्रॅम उकडलेले छोटे बटाटे, 3 चमचे पुदिन्याची चटणी,1 चमचा चाट मसाला, थोडा लिंबाचा रस, आवश्यकतेनुसार तेल, 1 चमचा काश्मिरी तिखट,कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि काळे मीठ. कृती: पुदिन्याची चटणी, चाट मसाला आणि मीठ एकत्र करून बटाट्यावर भुरभुरा. तव्यावर तेल टाकून कुरकुरीत होईपर्यंत तळा. एका प्लेटमध्ये सजवा आणि वर काश्मिरी लाल तिखट, काळे मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीरने सर्व्ह करा.
Link Copied