Close

रेड व्हेलवेट केक सॅण्डविच (Valentine’s Day Special: Red Velvet Cake Sandwich)


साहित्य : केकसाठी : 70 ग्रॅम मैदा, पाव टीस्पून बेकिंग पावडर, 50 ग्रॅम ताक, 3 ग्रॅम कोको पावडर, 4 ग्रॅम लाल रंग, 35 ग्रॅम बटर, 70 ग्रॅम कॅस्टर शुगर, पाव टीस्पून बेकिंग सोडा, पाव टीस्पून व्हिनेगर.
फिलिंगसाठी : 25 ग्रॅम क्रीम चीज, 50 ते
60 ग्रॅम कॅस्टर शुगर, 50 ग्रॅम फ्रेश क्रीम.
कृती : मैदा आणि बेकिंग पावडर चाळणीने एकत्र चाळून घ्या. एकीकडे ताक, कोको पावडर आणि लाल रंग यांचं एकजीव मिश्रण तयार करून ठेवा. बटर आणि कॅस्टर शुगर एकत्रितपणे बटरचा रंग पांढरा होईपर्यंत इलेक्ट्रिक बिटरने फेटा. हळूहळू त्यात ताकाचं मिश्रण घाला आणि सोबत इलेक्ट्रिक बिटरने फेटत राहा. नंतर त्यात थोडं थोडं करून मैद्याचं मिश्रण घाला आणि कट अँड फोल्ड पद्धतीने एकत्र करा. शेवटी व्हिनेगर आणि सोडा एकत्र करून त्यात घाला आणि हलक्या हाताने एकत्र करून घ्या.
हे मिश्रण, बटर आणि मैद्याने ग्रीस केलेल्या बेकिंग ट्रेमध्ये घालून 180 डिग्री प्रीहिटेड ओव्हनमध्ये 20 ते 25 मिनिटं बेक करा. केक बेक झाल्यावर थोडा वेळ थंड होऊ द्या. नंतर केकचे उभे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करा. नंतर प्रत्येक तुकड्याचे मधून आडवे दोन किंवा तीन भाग करा.
फिलिंगसाठी, क्रीम चीज आणि कॅस्टर शुगर इलेक्ट्रिक बिटरने एकत्र फेटून घ्या. दुसर्‍या भांड्यात क्रीम वेगळं फेटून घ्या. त्यात आपल्या आवडीनुसार क्रीम चीजचं फेटलेलं मिश्रण चमच्याच्या साहाय्याने एकत्र करा. हे मिश्रण केकच्या दोन तुकड्यांमध्ये लावून रेड व्हेलवेट केक सॅण्डविच तयार करा. केक बेक झालाय हे कसं ओळखाल?
केकमध्ये टूथपिक घालून पाहा. टूथपिकला केकचं मिश्रण चिकटलं नाही, म्हणजे केक तयार झाला, असं समजा. अन्यथा पुन्हा काही मिनिटांसाठी बेक होऊ द्या.

Share this article