व्हेज गोल्ड कॉईन
साहित्य : 2 स्लाइस ब्रेड, 1 उकडलेला बटाटा, उकडलेल्या मिश्र भाज्या (फ्लॉवर, कोबी, फरसबी इ.), 1 चमचा कॉर्नफ्लोअर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, काही तीळ, मीठ आणि चवीनुसार पांढरी मिरी पावडर, तळण्यासाठी तेल.
कृती : ब्रेडचे गोल आकारात काप करा. आता सर्व भाज्यांमध्ये बटाटे मॅश करा आणि मिक्स करा. हिरवी मिरची, मीठ, पांढरी मिरी पावडर, कॉर्नफ्लोअर मिक्स करा, आता भाजीचे मिश्रण ब्रेडच्या तुकड्यांवर ठेवा, वर ब्रेडचा दुसरा तुकडा त्यावर ठेवा. तीळ लावा आणि सोनेरी होईपर्यंत तळा.
बेक्ड पोटॅटो डिलाईट
साहित्य : 4-5 उकडलेले बटाटे, 2 वाट्या उकडलेले मटार,1 बारीक चिरलेला कांदा, 1 टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे आले-लसूण पेस्ट, 50 ग्रॅम बटर, अर्धी वाटी दूध,1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, ब्रेड क्रम्स, 1 टीस्पून जिरे आणि काळी मिरी पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ.
कृती : उकडलेले बटाटे सोलून किसून घ्या. त्यात दूध आणि बटर घाला. जिरे आणि काळी मिरी बारीक वाटून मिक्स करा. चवीनुसार मीठ घाला. त्यात थोडे ब्रेड क्रम्स मिसळा. कढईत थोडे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो परतून घ्या. आता आलं-लसूण पेस्ट, मीठ, साखर, गरम मसाला घाला. बटाट्याचे मिश्रण आणि उकडलेले वाटाणे घाला. एका बेकिंग डिशवर थोडे बटर लावून त्यात बटाट्याचे मिश्रण घाला. वरती ब्रेड क्रम्प्स भुभुरा. पुन्हा थोडे बटर लावा आणि 160 डिग्री सेल्शिअस वर सेट करून बेक करा.