Close

ट्रान्सवुमन म्हणून ऐश्वर्या रायने दिलेला मानसन्मान आठवून सायशा शिंदे भावुक (Aishwarya Rai Bachchan Gave Huge Respect to Transwoman Saisha shinde)

सायशा शिंदेने फॅशन डिझायनर म्हणूनही अनेक चित्रपटांमध्ये काम करून वेगळी ओळख निर्माण केली. पण काही वर्षांपूर्वी, तिने आपण एक ट्रान्सवुमन असल्याचे सांगत स्वप्नीलपासून सायशा झाली असा खळबळजनक खुलासा केला होता. अलीकडे, टिस्का चोप्राशी यूट्यूब चॅनेलवर मुलाखत देताना तिने जेव्हा जगाला तिच्या ट्रान्सवुमन असण्याबद्दलचे सत्य माहित नव्हते तो किस्सा सांगितला.

सायशा शिंदे म्हणाली, 'ही गोष्ट त्यावेळी वर्तमानपत्रात आली नव्हती. इंडस्ट्रीतील माझ्या जवळच्या मित्रांनाच याबद्दल ठावूक होते. माझी त्यावेळी ऐश्वर्याशीही चांगली मैत्री होती. म्हणूनच मी ऐश्वर्याच्या मॅनेजरला आता येणारा स्वप्निल नसून ती सायशा असेल त्यामुळे मॅडम आणि इतरांना याचा धक्का बसणार नाही याची काळजी घे असे सांगून ठेवलेले.

सायशा शिंदेने पुढे सांगितले की, ऐश्वर्या रायच्या मॅनेजरने येणारी व्यक्ती स्वप्निल शिंदे नसून सायशा शिंदे आहे हे समजेल याची योग्य काळजी घेतली. तिने सांगितले की, 'जेव्हा मी फिटिंगसाठी जायची, तेव्हा ऐश्वर्याने मला नेहमी सायशा म्हणायची. ती मला प्रत्येक वेळी त्याच नावाने हाक मारायची. तिने मला आदर दिला. ऐश्वर्याची मुलगी आराध्या आत आल्यावर तिने माझी सायशा नावाने ओळख करून दिली.

सायशा पुढे म्हणाली की, ऐश्वर्याने सायशा म्हणून स्वप्नीलला आदर आणि प्रेम दिले हे पाहून मी भावूक झाली. सायशा तो क्षण कधीच विसरली नाही आणि आजही तिच्या तो कायम लक्षात आहे. मात्र, सायशाच्या धाडसाचे कौतुक करावे लागेल की, समाजाची पर्वा न करता तिने मनाचे ऐकले आणि स्वत:ला ट्रान्सवुमन म्हणून स्वीकारले. आज ती आपल्या आयुष्यात खूप आनंदी आहे.

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Share this article