ब्रोकोली सूप
साहित्यः 1 टेबलस्पून बटर, 300 ग्रॅम ब्रोकोली, पाऊण कप चिरलेला कांदा, 1 चिरलेले गाजर, चवीनुसार मीठ आणि मिरपूड, 1 टेबलस्पून मैदा, 2 कप पाणी, पाव कप क्रीम, क्रूटॉन्स (ब्रेडचे तळलेले तुकडे)
कृती: नॉनस्टिक पॅनमध्ये बटर गरम करावे. त्यात ब्रोकोली, कांदा, आणि गाजर घालावे. थोडे मीठ आणि मिरपूडसुद्धा घालावी. मध्यम आचेवर कांदा थोडा पारदर्शक होईस्तोवर परतावे. यामध्ये मैदा घालून परतावे. पाणी घालून उकळी काढावी. मध्यम आचेवर 10 मिनिटे उकळी काढावी. क्रीम घालून ढवळावे. मिक्सरमध्ये प्युरी करावी. पुन्हा सूप गरम करून सर्व्ह करावे. सर्व्ह करताना बरोबर तळलेले किंवा बेक केलेले ब्रेडचे तुकडे (क्रूटॉन्स) द्यावे.