कॅरेमल योगर्ट
साहित्य : 1 लिटर दूध, 1 वाटी साखर, 1 वाटी कंडेन्स मिल्क, 1 चमचा दही विरजणासाठी
कृती : दीड लिटर दूध उकळवून एक लिटर होईपर्यंत आटवून घ्या. एका पॅनमध्ये साखर घेऊन त्यात तीन ते चार चमचे पाणी टाका. हे मिश्रण गरम करायला ठेवा. साखरेचा पाक तांंबुस रंगाचा झाल्यावर (कॅरेमल) आच बंद करा. आटवलेल्या दुधात ही साखर टाका. कंडेन्स मिल्क टाकून व्यवस्थित एकत्र करुन घ्या. मिश्रण थोडं थंड होऊ द्या. मिश्रण किंचित कोमट असेल तेव्हा यात विरजण टाकून दही लावा. हे दही (योगर्ट) मातीच्या भांड्यांमध्ये किंवा वाट्यांमध्ये हे योगर्ट 4 ते 5 तास सेट करायला ठेवा. नंतर फ्रिजमध्ये ठेवून थंड करा आणि सर्व्ह करा.
टिप : बारीक किसलेले काजू आणि बदाम सजावटसाठी टाकू शकता.