Close

लसणीचे लोणचे व आल्याचे लोणचे (Garlic Pickle And Ginger Pickle)

लसणीचे लोणचे
साहित्यः 100 ग्रॅम सोललेली लसूण, 1 वाटी लिंबाचा रस, प्रत्येकी 1 चमचा मोहरीपूड, मेथीपूड, प्रत्येकी अर्धा चमचा मिरपूड, ओवा, चवीनुसार मीठ.
कृतीः लसूण, मीठ, लिंबाचा रस सर्व एकत्र करावे. चांगले हलवून एक दिवस उन्हात ठेवावे. दुसर्‍या दिवशी मोहरीपूड, मेथीपूड, मिरपूड, ओवा घालावा. सर्व नीट कालवावे. पुढचे दोन दिवस हे मिश्रण उन्हात ठेवावे.

आल्याचे लोणचे
साहित्यः 1 वाटी आल्याचा कीस, 1 चमचा जिरे, 1 चमचा शहाजिरे, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा ओवा, अर्धी वाटी लिंबाचा रस.
कृतीः जिरे, शहाजिरे, ओवा खरबरीत कुटून आल्याच्या किसात घालावा. त्यातच तिखट, मीठ घालावे. नीट कालवल्यावर वरती लिंबाचा रस घालावा. हे लोणचे बाटलीत भरून चार दिवस उन्हात ठेवावे.

Share this article