Close

कडबू (Kadbu)

कडबू


साहित्य : 4 वाट्या चणा डाळ, 3 वाट्या गूळ, 2 वाट्या गव्हाचे पीठ, 1 चमचा मैदा, 1 वाटी तांदळाचे पीठ, अर्धा वाटी तेल.
कृती : मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र चाळून त्याचे एकदम घट्ट पीठ भिजवा. हे पीठ स्टीलच्या भांड्यात ठेवून त्यात बोटांनी दाबून खड्डे करा. त्यात सर्व खड्डे भरतील इतके तेल घालून किमान दोन तासांकरिता हे पीठ तसेच ठेवून द्या. नंतर पुन्हा चांगले घट्टसर मळून घ्या. चणा डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. नंतर चाळणीतून गाळून त्यातील जास्तीचे पाणी बाजूला काढून घ्या. कढईमध्ये शिजलेली चण्याची डाळ आणि गूळ घालून पूर्णतः कोरडी होईपर्यंत शिजवा. हे मिश्रण पुरण यंत्रातून फिरवून घ्या. पुरण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या. पिठाच्या पुर्‍या तयार करून त्यात सारण म्हणून पुरण भरा आणि करंजी तयार करा. ही करंजी उकडून घ्या, म्हणजे कडबू तयार होईल.
टीप : पुरीमध्ये सारण भरून करंजी तयार केल्यावर त्यास कात्रणाने आकार न देता, बोटांच्या साहाय्याने दुमडून करंजी तयार केल्यास, त्यास मुरड असे म्हणतात.

Share this article