मराठी मनोरंजन सृष्टीची लोकप्रिय नायिका मृणाल दुसानीस सध्या चर्चेत आहे. तिचा नवरा नीरज कामानिमित्त परदेशात वास्तव्यास असतो. त्यामुळे मृणाल सुद्धा त्याच्यासोबत गेली काही वर्ष राहत होती. मात्र आता ती तब्बल चार वर्षांनी भारतात परतली आहे. मृणाल मायदेशी परतताच तिचे चाहते देखील खूप खुश झाले. ती आल्यापासून सर्वजण, तू पुन्हा टीव्हीवर कधी दिसणार असा प्रश्न विचारत आहेत. एबीपी माझा ला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या भविष्यातील प्लॅनिंग बद्दल सांगितले.
मृणाल म्हणाली की, “चार वर्षांनी मी नवरा व लेकीसह मायदेशी परतली आहे आणि खूप छान वाटतं आहे. आता मी भारतात राहण्याचा निर्णय घेतला आहे. माझी लेक नुर्वी पहिल्यांदा नाशिकला आली असून तिला संपूर्ण नाशिक फिरवताना खूप मजा आली.”
“मला आता पुन्हा काम सुरू करायचं आहे. प्रेक्षक मला आगामी कामाबाबत विचारणा करत आहेत. त्यामुळे मी आता चांगल्या संधीची वाट पाहत आहे. माझी चित्रपटात काम करण्याची खूप इच्छा आहे. याशिवाय मला नाटकातही काम करायला आवडेल. याआधी प्रायोगिक नाटकात काम केलं असून आता मला व्यावसायिक नाटकात काम करण्याची इच्छा आहे.”
मृ मृणाल ने २४ मार्च २०२२ ला मुलीला जन्म दिला. नूरवी असे तिच्या मुलीचे नाव. पूर्वी पहिल्यांदाच आपल्या आई-बाबांसोबत भारतात आली आहे.