Close

मैसूर मसाला डोसा आणि खोबर्‍याची चटणी (Mysore Masala Dosa And Coconut Chutney)

मैसूर मसाला डोसा

साहित्य : 2 कप तांदूळ, प्रत्येकी पाव कप उडीद डाळ व मूग डाळ, स्वादानुसार मीठ.
सारणाकरिता : 2 उकडून कुसकरलेले बटाटे, 1 कांदा लांबट चिरलेला, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, प्रत्येकी अर्धा टीस्पून धणे पूड व मोहरी, 1 टीस्पून उडीद डाळ, थोडी कोथिंबीर व कढीपत्ता, स्वादानुसार मीठ.
इतर साहित्य : प्रत्येकी अर्धा कप किसलेले गाजर व बीट, खोबर्‍याची चटणी, आवश्यकतेनुसार तेल वा तूप.
कृती : तांदूळ व उडीद डाळ एकत्र 8-10 तासांकरिता भिजत ठेवा. मूग डाळ 2 तास भिजत ठेवा. तांदूळ व उडीद डाळ एकत्र बारीक वाटून घ्या व मूग डाळ वेगळी बारीक वाटून घ्या. नंतर दोन्ही मिश्रणे एकत्र करून त्यात थोडे मीठ घालून एकजीव मिश्रण तयार करा. हे मिश्रण 7-8 तासांकरिता झाकून ठेवा.
सारणाकरिता : एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता, हिरवी मिरची व कांदा घालून चांगले परतवून घ्या. कांदा सोनेरी रंगाचा झाला की, त्यात टोमॅटो घालून शिजवून घ्या. नंतर बटाटे, धणे पूड व मीठ घालून मिश्रण एकजीव करा आणि 5 मिनिटे शिजत ठेवा. शेवटी आचेवरून उतरवून त्यात कोथिंबीर एकत्र करून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यास तेल लावून त्यावर 1 डाव डोशाचे पीठ पातळ पसरवा. कडेने थोडे तेल वा तूप सोडा. डोशावर खोबर्‍याची चटणी पसरवून त्यावर किसलेले गाजर, बीट व बटाट्याची भाजी पसरवा. डोसा एका वा दोन्ही बाजूंनी दुमडून कुरकुरीत करून घ्या. खोबर्‍याची चटणी व सांबारासोबत सर्व्ह करा.

खोबर्‍याची चटणी


साहित्य : 1 कप खोवलेले खोबरे, 3 हिरव्या मिरच्या, प्रत्येकी पाव कप रवा व भाजलेले शेंगदाणे, प्रत्येकी अर्धा टीस्पून मोहरी, उडीद डाळ व जिरे, थोडा कढीपत्ता, 3 हिरव्या मिरच्या, आवश्यकतेनुसार तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : खोबरे, हिरवी मिरची, रवा, शेंगदाणे व मीठ एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. फोडणीच्या भांड्यात गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, उडीद डाळ, लाल मिरची
व कढीपत्त्याची फोडणी करून, ही फोडणी खोबर्‍याच्या वाटणामध्ये एकत्र करा.

Share this article