Close

पाकातले बेसन लाडू आणि रव्याचे लाडू (Pakatle Besan Ladoo And Ravyache Ladoo)

पाकातले बेसन लाडू

साहित्य: 1 वाटी बेसन, अर्धा वाटी साजूक तूप, पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी पाणी, वेलची पूड बेदाणे.
कृती: तूप पातेल्यात गरम करावे. त्यात बेसन घालून मध्यम आचेवर खमंग भाजावे. बेसन गॅसवरून उतरवावे. पाणी आणि साखर एकत्र गरम करत ठेवावे व त्याचा एकतारी पाक करावा. तयार झालेला पाक गरम असतानाच भाजलेल्या बेसनात घालून ढवळावे. ढवळताना बेसनाची गोळी होण्याची शक्यता असते. त्याची काळजी घ्यावी. हळूहळू पाक बेसनात मुरतो. मधेमधे मिश्रण ढवळत राहावे. मिश्रणात वेलची पूड घालावी. मिश्रण थोडे घट्टसर झाले की लाडू वळावेत. लाडू वळताना त्यावर एक एक बेदाणा लावावा.

रव्याचे लाडू


साहित्य: 2 वाट्या बारीक रवा, 1 वाटी पाणी, दिड वाटी साखर, अर्धा वाटी साजूक तूप, 1 लहान चमचा वेलची पूड.
कृती: प्रथम रवा मध्यम आचेवर तुपावर भाजून घ्यावा. खमंग वास आला की गॅसवरून उतरवावा.
पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करून घ्यावा. साखर वितळली आणि पाण्याला उकळी फुटली की 3 ते 4 मिनिटात एकतारी पाक तयार होतो. भाजलेल्या रव्यात पाक ओतावा. गुठळ्या न होता मिक्स करावे. त्यात वेलची पूड घालावी. हे रव्याचे आणि साखरेचे मिश्रण झाकून ठेवावे. तासाभरात मिश्रण आळते. मग लाडू वळावेत.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/