पापडी चाट
साहित्य: 8-10 पापडी किंवा तयार पुरी, अर्धी वाटी काळे चणे (रात्रभर पाण्यात भिजवलेले),अर्धी वाटी उकडलेले आणि चौकोनी कापलेले बटाटे, 1 टीस्पून सैंधव मीठ, 1 टीस्पून काश्मिरी तिखट, 2 चमचे हिरवी चटणी, 2 चमचे आंबट- गोड चटणी, 1 कप दही.
कृती : मैदाच्या पुर्याप प्लेटमध्ये ठेवा. त्यावर उकडलेले बटाटे आणि काळे चणे ठेवा.त्यावर फेटलेले दही घाला. वर काश्मिरी लाल तिखट, सैंधव मीठ, हिरवी चटणी आणि आंबट-गोड चटणी घालून सर्व्ह करा.
ग्रीन डोसे
साहित्य: 1 वाटी भिजवून वाटलेली मूग डाळ, अर्धा कप किसलेले पनीर, अर्धा वाटी बटाटे, अर्धी वाटी किसलेले कोबी,
2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1/4 टीस्पून जिरेपूड, मीठ चवीनुसार आणि तेल.
कृती : कढईत थोडे तेल गरम करा. मोठ्या आचेवर हिरव्या मिरच्या, बटाटे, कोबी परतून घ्या. जिरे, मीठ आणि पनीर मिक्स करा. एक मिनिट भाजल्यानंतर विस्तवावरून उतरवा. तव्यावर मुगाच्या डाळीचे पातळ डोसे बनवा. त्यात पनीर-कोबी मसाला घालून डोशांप्रमाणे फोल्ड करून सर्व्ह करा.