बॉलिवूडच्या पॉवर कपल्सपैकी एक असलेल्या करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा जेह अली खान काल म्हणजेच 21 फेब्रुवारीला 3 वर्षांचा झाला. आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या जोडप्याने स्पायडर-मॅन थीम असलेली वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. आता बर्थडे बॅशचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
करीना कपूरचा धाकटा मुलगा जहांगीर अली खान उर्फ जेह 21 फेब्रुवारीला तीन वर्षांचा झाला. या आनंदाच्या प्रसंगी, जोडप्याने स्पायडर-मॅनच्या थीमवर एक भव्य पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आपल्या मुलांसोबत सहभागी झाले होते.
रणबीर कपूर आणि राहा कपूरपासून ते सोनम कपूर-वायू कपूर आणि नेहा धुपिया त्यांच्या मुलासोबत जेहच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला हजर होते.
व्हायरल झालेल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये जेह स्पायडर मॅनचा मोठा केक कापताना दिसला. दुसऱ्या फोटोत करीना आणि जेह सोहा अली खान, सबा अली खान आणि इनाया खेमूसोबत पोज देताना दिसत आहेत.
ही छायाचित्रे पाहून असे वाटले की लहान जेहने त्याच्या मित्रांसोबत खूप मजा केली असेल.