पोटॅटो मफिन्स
साहित्य : 3 कप उकडून कुस्करलेले बटाटे, 60 ग्रॅम मैदा, 60 ग्रॅम बटर, पाव कप दूध, 1 टीस्पून व्हिनेगर, 1 कप किसलेलं चीझ, 1 टीस्पून बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून जायफळ पूड, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, 2 अंडी फेटलेली.
कृती : ओव्हन 180 डिग्री सेल्सियसवर प्रीहिट करत ठेवा. चीझ सोडून उर्वरित सर्व साहित्य एका वाडग्यामध्ये घेऊन बिटरच्या साहाय्याने व्यवस्थित फेटून घ्या. आता हे साहित्य ग्रीस केलेल्या मफिन्सच्या साच्यांमध्ये अर्धा भाग भरा. त्यावर किसलेलं चीझ भुरभुरा. हे साचे प्रीहिटेड ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सियसवर 20 ते 22 मिनिटं बेक करा. मफिन्स व्यवस्थित बेक झाले की थोडा वेळ थंड होऊ द्या. नंतर साच्यातून काढून सर्व्ह करा.
पोटॅटो मफिन्स (Potato Muffins)
Link Copied