Close

मृत्यूच्या दारातून परतली नॅशनल क्रश रश्मिका मंदाना ( Rashmika Mandanna Flight Emergency Landing Saved From Death)

दक्षिणेतील तसेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ज्या फ्लाइटमधून प्रवास करत होती त्या फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या बातमीमुळे रश्मिकाच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रश्मिका प्रवास करत असलेले विमान मुंबईहून हैदराबादला जात होते, टेकऑफनंतर ३० मिनिटांनी तांत्रिक बिघाडामुळे ते मुंबई विमानतळावर परत आले.

रश्मिका मंदान्नाने याबाबत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, तिने कॅप्शनमध्ये लिहिलेले की, 'फक्त तुमच्या माहितीसाठी, आज आम्ही अशा प्रकारे मृत्यूपासून बचावलो...'

ते विमान मुंबईहून हैदराबादला जात होते. तांत्रिक बिघाडामुळे ३० मिनिटांनी पुन्हा ते मुंबईला परतले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास नुकतीच ती रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी यांच्यासोबत सुपरहिट 'ॲनिमल' चित्रपटात दिसली होती. तसेच येत्या काळात ती अल्लू अर्जुन सोबत 'पुष्पा २' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Share this article