Close

वॉनटॉन सूप (Wonton Soup)

वॉनटॉन सूप


साहित्यःसारण: 1 मध्यम गाजर, 1 मध्यम भोपळी मिरची, पाऊण कप कोबी, पातळ चिरून 5-6 फरसबी, 3 मशरूम, पाव कप टोफू छोटे तुकडे करून, 2 पाती कांद्याच्या काड्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून लसूण पेस्ट, 2 टीस्पून बारीक चिरलेले आले, 2 टीस्पून सोया सॉस, चवीपुरते मीठ,1 टेबलस्पून तेल.

कव्हरसाठीः 1 कप भरून मैदा, अधार्र् टीस्पून मीठ.

सूपसाठी: 6 ते 7 वाट्या व्हेजिटेबल स्टॉक, चवीपुरते मीठ,2-3 लसूण आणि पाव टीस्पून आल्याची पेस्ट, अधार्र् टीस्पून व्हिनेगर

कृती: सारणासाठी गाजर, भोपळी मिरची, कोबी, फरसबी, मशरूम, टोफू, मिरची आणि पातीचा कांदा बारीक चिरून घ्यावा. कढईत तेल गरम करावे. त्यात आले-लसूण परतावे. त्यात पातीचा कांदा परतावा. नंतर सर्व भाज्या मोठ्या आचेवर एखाद मिनिट परताव्यात. सोया सॉस आणि मीठ घालावे. हे सारण वाडग्यात काढून ठेवावे. मैदा, मीठ आणि पाणी एकत्र करून पीठ मळावे. 15 मिनिटे झाकून ठेवावे. नंतर मध्यम आकाराच्या द्राक्षाएवढे गोळे करावे (2 सें.मी). कॉर्न फ्लोअर लावून पातळ लाटावेत. लाटलेल्या पारीच्या मध्यभागी 1 लहान चमचा सारण ठेवावे. अर्ध्या पारीच्या कडेला पाण्याचे बोट लावावे. करंजीसारखे दुमडून सील करावे. दोन कडा मागच्या बाजूने एकत्र जुळवाव्यात. अशा प्रकारे सर्व वॉनटॉन्स बनवून घ्यावे. व्हेजिटेबल स्टॉकमध्ये मीठ आणि आले-लसूण घालून उकळत ठेवावे. उकळी फुटली की साधारण 15 ते 16 वॉनटॉन्स आत घालावे. 5 मिनिटे उकळू द्यावे म्हणजे वॉनटॉन्स शिजतील. वॉनटॉन्स शिजले की वर तरंगतील. सूपमध्ये व्हिनेगर घालावे. प्रत्येक सर्व्हिंग बाऊलमध्ये 3-4 वॉनटॉन्स आणि स्टॉक घालावा. सूप लगेच सर्व्ह करावे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/