कोकोनट रोज सरबत
साहित्य : 1 शहाळ्याचे पाणी, अर्धी वाटी शहाळ्यातील मलई, 1 टेबलस्पून रोज सिरप, एक कप व्हॅनिला आइस्क्रीम.
कृती : काचेच्या ग्लासात प्रथम दोन चमचे रोज सिरप टाका. यावर शहाळ्याचे पाणी ओता. वरून व्हॅनिला आइस्क्रीमचा एक स्कूप टाका. आइस्क्रीमवर हळूच रोज सिरप ओता. जे ओघळल्याप्रमाणे दिसायला हवे. आइस्क्रीमशिवाय उरलेल्या भागात शहाळ्यातील मलईचे तुकडे ठेवा. स्ट्रॉसह हे सरबत सर्व्ह करा.
खस-कैरी सरबत
साहित्य : 2 टेबलस्पून खस सिरप, 2 कप कैरीचे तुकडे, 4 टेबलस्पून साखर, 500 मि.ली. लेमन फ्लेवर सोडा,
1 टीस्पून काळं मीठ, बर्फाचा चुरा.
कृती : कैरीचे साल काढून तुकडे करा. कैरीचे तुकडे आणि साखर एकत्र करून साखर विरघळेपर्यंत शिजवून घ्या. हे मिश्रण थंड होऊ द्या. आता ग्लासमध्ये थोडेसे खस सिरप टाका. यावर कैरीचे मिश्रण टाका. यावर बर्फाचा चुरा टाका व यात लेमन सोडा ओता. आता काळं मीठ भुरभुरवून सरबत साधारण हलवा. पुन्हा खस सिरप टाका आणि खस-कैरी सरबत सर्व्ह करा.