घोळ लिंबू आणि पाचक लिंबू
साहित्यः 1 डझन मोठी लिंबे, पाव किलो मीठ.
कृतीः रसाळा लिंबे घेऊन ती धुऊन, पुसून त्यावर मीठ घालून ती बरणी उन्हात ठेवावी. रोज रात्री लिंबे खालीवर करावीत. म्हणजे लिंबे मिठात नीट घोळली जातील. असे खूप दिवस करावे. लिंबाला सुरकुत्या पडल्या की लोणचे तयार झाले असे समजावे. हे लोणचे औषधी समजले जाते.
पाचक लिंबू
साहित्यः 25 लिंबे, 1 वाटी मीठ, पाव वाटी तिखट, 3 चमचे ओवा.
कृतीः 25 मधील 6 लिंबांचा रस काढावा. ओव्याची बारीक पूड करावी. त्यात तिखट, मीठ मिसळावे. लिंबांना वांग्याप्रमाणे चिरा द्याव्यात व त्यात वरील मसाला भरावा व बरणी उन्हात ठेवावी. लिंबू मऊ झाले किंवा त्यांचा रंग बदलला की लोणचे तयार झाले असे समजावे व त्यांवर लिंबाचा रस पिळावा. हे लोणचे पाचक आहे.